साताऱ्यात ‘बहुजन मुक्ती’च्या पदाधिकाऱ्यांची झाली पत्रकार परिषद, भाजप विरोधी आखली रणनीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे बहुजन मुक्ती पार्टीची पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. या बैठकीनंतर पदाढीकारींच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी “आताची लोकसभा निवडणूक ही भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. यातूनच देशात लोकशाही राहणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर भाजप सत्तेवरच येणार नाही,” असा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. राहुल मखरे यांनी केला.

सातारा येथील पत्रकार परिषदेवेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, प्रदेश सचिव तुषार मोतलिंग, अमोल लोंढे, आर. आर. पाटील, सागर सुतार आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. मखरे म्हणाले, बहुजन मुक्ती पार्टीची देशातील ३२ राज्यात कार्यकर्त्यांची फळी आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने साताऱ्यात बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा देखील करण्यात आली आहे. तसेच आताची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. कारण, देशात जात-धर्माच्या नावाने विशिष्ट लोकांकडून द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यातच भाजपचे सरकार देशात आपली सत्ता येणार नाही म्हणून इडी आणि इतर शासकीय यंत्रणांचा वापर करत आहे.

यासाठी आताच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्व विरोधक एकत्र आलेतर भाजपच्या खासदारांची संख्या शंभरच्या आत येईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबाबत आताच सर्व्हे समोर आणले जात आहेत. ४०० हून अधिक जागा मिळणार म्हणून सांगितले जात आहे. कोणाला न विचारताच हे सर्व्हे होत आहेत. यातून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम सुरू असल्याचे दिसत असल्याचे