कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत या जिल्ह्याचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चे बांधणी करू लागले आहेत. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र व राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांचे नाव अग्रस्थानी आहे. सारंग पाटील यांचा साधेपणा आणि सर्वसामान्यांचा नेता हि छबी जिल्ह्यातील मतदारांना भावते आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आमचा खासदार असाच सर्वमान्य असावा अशी भावना व्यक्त करत सारंग पाटील हेच खासदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
आगामी निवडणुकीसाठी खासदार शरद पवार हे सारंग पाटील यांना उमेदवारीच तिकीट देतील अशी चर्चा आहे. त्यासाठी सारंग पाटील यांनी देखील जोमाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील कराड दक्षिण, उत्तरसह पाटण विधानसभा मतदार संघात त्यांच्याकडून संपर्क दौरे देखील केले जात आहे. शांत, अभ्यासू आणि दूरदृष्टी असणारा नेता हि आगामी काळाजी गरज आहे हे ओळखून राष्ट्रवादीकडून यंदा सारंग पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी होत आहे.
या वर्षी राज्यात लोकसभा, विधानसभा आणि पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा महत्वाचा पक्ष असल्याने राष्ट्रीवादी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांच्यावर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पवार साहेब जे उमेदवार देतील तो निवडून आणला जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सारंग पाटील यांचे नाव चर्चेत असून त्यांच्याकडून गावागावात संपर्क दौरे करत लोकांच्या गाठीभेटी देखील घेतल्या जात आहेत.
यंदा आपलं खासदार सारंगबाबाच…
राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा जिल्ह्यासह सर्वत्र प्रचंड जनसंपर्क आहे. मागील पाच वर्षांत पाटील यांनी विकासकामांचा सपाटाच लावलेला आहे. यासर्व प्रक्रियेत युवा नेते सारंग पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावर ऑन फिल्ड उतरून गावागावातील विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. तसेच राष्ट्रवादीसाठी पक्षबांधणीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली आहे. सद्या सारंगबाबांकडून कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदार संघात वडील खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन केली जात आहे. तसेच संपर्क दौरे देखील केले जात असून त्यांच्याबाबत मतदार संघातील सर्वसामान्य लोक यंदा सारंगबाबाच आपले लोकसभेचे उमेदवार असे म्हंटले जात आहे.
२०१९ ची निवडणूक आजही लोक विसरलेले नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांच्या आदेशानुसार सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन श्रीनिवास पाटील यांनी १९९९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून खळबळ माजवली होती. २०१९ ला राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर उदयनराजेंनी तीनच महिन्यात राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना उभं केलं. त्यांच्या प्रचारासाठी भर पावसात सभा घेऊन विजय खेचून आणला. त्यावेळी देखील श्रीनिवास पाटलांना राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध होता. परंतु पवारांच्या आदेशामुळे सर्व नेत्यांनी एकदिलानं काम करून त्यांना निवडून आणलं होतं.