पुणे-सातारा रस्त्यावर ससेवाडीत प्रवासी वाहतूक कारणाऱ्या बसला भीषण आग

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे सातारामार्गावर खेड शिवापूर येथील ससेवाडी फाट्यावरील उड्डाणपुलावर गुरुवारी दुपारी एका प्रवासी वाहतूक कारणाऱ्या खासगी बसने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी सदर प्रवासी वाहतूक करणारी ही खासगी बस साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाली होती. साधारण दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ससेवाडी फाट्यावर मायक्रो कंपनी समोरील उड्डाणपुलावर ही बस आली. यावेळी चालकाला बसच्या मागील भागाला आग लागल्याचे आरशात दिसले. ते पाहून बस बाजूला थांबवून तत्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे या आगीत कोणालाही ईजा अथवा दुखापत झाली नाही. आग लागण्याचे कारण समजले नाही.

मात्र, आगीने क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केले. काही वेळातच संपूर्ण बस या आगीत जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतुकीचे नियंत्रण केले.शेजारील डब्ल्यूओम कंपनीची आग विझविणारी यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक यांनी या बसला लागलेली आग विझवली.