सातारा प्रतिनिधी | सातारा येथील राजवाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास नगर वाचनालयाजवळ एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली.
गोपाल विजयकुमार लकेरी (वय 49 वर्षे, रा. 102 प्रतापगंज पेठ, सातारा) असे संबंधित मृत व्यक्तीचे नाव आहे. संबंधित व्यक्तीचा मृतदेह हा पायापासून मांड्यापर्यंत अर्धवट जळालेल्या स्थितीत होता. सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांच्या ही घटना निदर्शनास आली. नागरीकांनी तत्काळ याबाबत शाहूपुरी पोलिसाना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवली.
गोपाल विजयकुमार लकेरी असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले असून सदर व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शेकोटी करताना लागली आग
संबंधित मनोरुग्ण व्यक्ती हा दि.19/01/2024 रोजी सदर मयत इसम हा काल दुपारी घरातुन गेला. दिवसभर फिरुन रात्रौ नगरवाचनालयाचे समोर एकटाच शेकोटी करुन बसला होता. यातच त्याला आग लागली.