सातारा प्रतिनिधी । सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी गांधी मैदान ते शिवतीर्थ दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.
साताऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात गांधी मैदान ते शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली शोभायात्रा pic.twitter.com/nV7RmjyFLG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 11, 2024
ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा
सातारा येथील गांधी मैदानावरून ढोल ताशांच्या गजरात, हलगीच्या निनादात आणि गजी नृत्याने शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी पारंपारिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते.
शिवतीर्थावर शोभायात्रेची सांगता
गांधी मैदानावरून सुरू झालेली शोभायात्रा राजपथावरून शिवतीर्थावर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन केले. त्यानंतर शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी जात पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.