अगोदर मोबाईलवर ठेवला स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस; नंतर नवविवाहित तरुणानं केलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी लग्न झालं. खासगी वाहनचालकाची नोकरी करून स्वप्नील आपला संसार चालवत होता. बायको माहेरी गेल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेतला. मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेवून स्वप्नीलने आत्महत्या केली. पाटण तालुक्यातील करपेवाडी गावात घडलेल्या या खळबळ उडाली आहे.

स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय 22), असे नवविवाहित तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटणच्या ढेबेवाडी खोऱ्यातील करपेवाडी गावचा रहिवासी असलेला स्वप्नील करपे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याचे वडील व मोठा भाऊ कामानिमित्ताने मुंबईला असतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी मुंबईला गेली गेली असताना स्वप्नीलने आत्महत्या केली.

स्वप्नील जेव्हा घरी होता तेव्हा रात्री घरी आई व स्वप्नील असे दोघेच होते. स्वप्नीलने खोलीत झोपायला गेल्यावर मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो फोटो ठेवला. तसेच ‘लवकरच ह्या फोटोला हार चढणार आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. माणसांसाठी आता बस्स,नाय जमणार पुढे आयुष्य काढायला आणि नाय ह्या फोटोला हार चढला तर मला… भावपूर्ण श्रद्धांजली !’ असा मजकूर लिहिला.

स्वप्नीलने त्याच्या मोबाईलवर ठेवलेला स्टेट्स त्याच्या मित्रांनी पाहिला. आणि मित्रांना एकच धक्का बसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता. स्वप्निलच्या घराकडे धाव घेतली. त्याच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने हाका मारल्या. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता स्वप्नीलने गळफास घेतल्याचे दिसते. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. स्वप्नीलच्या आत्महत्येचा कुटुंबीय आणि त्याच्या मित्र परिवाराला चांगलाच धक्का बसला आहे.