कराड प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून २ परप्रांतीय कामागारात झालेल्या शाब्दीक वादावरून एकचा खून झाल्याची घटना काल सोमवारी रात्री कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अन्य एका परप्रांतियास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस व घटना स्थळावरून मिळालेलया माहितीनुसार, छत्तीसगड येथून मजुरी कामासाठी काही कामगार भोसलेवाडी येथे आले. त्या कामगारामध्ये काल सोमवारी रात्री मारामारी झाली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
कामगारांच्यामध्ये मारामारी झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जखमीस उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारावेळी जखमीचा मृत्यु झाला. रात्री उशिरापर्यंत उंंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.