कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत एका गॅस पाईपच्या गोडावूनला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, कराड तालुकयातील गोटे गावच्या हद्दीत पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गॅस पाईपचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पाईपलाईन ठेवलेले गोडावून आहे. या गोडावूनला आज, दुपारी अचानकच आग लागली. आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात होते.
आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे कारण अस्पष्ट आहे. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांचा आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.