सत्तुराने वार करुन खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास 2 तासात अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एक महिलेच्या पतीस शिव्या का देतो? असे विचारल्याच्या कारणावरुन तिघांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कुमठे गावात शनिवारी सकाळी घडली होती. या प्रकरणी संबंधित हल्लेखोरांपैकी एकास बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या पथकाने 2 तासात अटक केली.

मनोज उर्फ सोन्या प्रकाश वाघमारे (रा. आसनगाव कुमठे ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. 05 रोजी सकाळी 11.15 वा.चे सुमारास कुमठे ता. जि. सातारा येथे फिर्याद दाखल केलेल्या एका महिलेच्या पतीस शिव्या का देतो असे विचारल्याच्या कारणावरुन 3 जणांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत बोरगांव पोलीस ठाणे येथे गुरनं. 360/2023 भादविसंक. 307,324,323, 504, 506, 34 प्रमाणे खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.

या घडलेल्या घटनेचे व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हयातील आरोपींना अटक करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यकी पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उप-निरीक्षक अमीत पाटील यांचे अधिपत्याखाली पथके तयार करुन त्यांना आरोपींचा शोध घेवून ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना सदर गुन्हा अभिलेखावरील सराईत इसमाने केला असल्याची व तो सातारा येथे त्याचे मित्रास भेटुन लातुर येथे पळुन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी प्राप्त माहिती तपास पथकास देत गुन्हयातील मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उप-निरीक्षक अमीत पाटील यांचे तपास पथकांनी मुख्य आरोपीस ढोरगल्ली परिसरात सापळा लावुन तो लातुर येथे पळुन जाण्याचे बेतात असतानाच त्यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याची व तो त्याचे मित्रास भेटुन लातुन येथे पळुन जाणार असल्याची कबुली दिली. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील आरोपीस गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 तासाच्या आत जेरबंद करुन त्यास पुढील तपासकामी बोरगांव पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. अरुण देवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक, अमीत पाटील, पो.हवा. संजय शिर्के, शरद बेबले, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, सनी आवटे, प्रविण फडतरे, हसन तडवी, पो.ना. अमित सपकाळ, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, पो.काँ. रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वी जाधव, संकेत निकम चालक पो.हवा. शिवाजी गुरव यांनी केली आहे.