कराड प्रतिनिधी | कराड शहरातील प्रीतिसंगम बागेत गेल्या २ महिन्यांपासून विषारी घोणस सर्पाचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे ही बाग काही दिवस नागरिकांसाठी बंदही ठेवण्यात आली होती. आंतापर्यंत घोणसची अनेक पिले येथे सर्पमित्रांकडून पकडण्यात आली, तरj बुधवारी सर्पमित्र मयूर लोहाना यांनी घोणस जातीचा मोठा सर्प पकडला आहे.
सध्या प्रीतिसंगम बागेत नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गवत कटाईचे काम सुरू आहे. या कामादरम्यान बागेतील झुडपांमध्ये लपून बसलेला मोठा घोणस सर्प आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र मयूर लोहाना घटनास्थळी दाखल झाले. त्वरित दक्षता घेत सापाला जिवंत पकडले.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आतापर्यंत कराडच्या प्रीतिसंगम येथील स्वामीच्या बागेत मागील तीन आठवड्यात घोणस जातीच्या तब्बल 17 पिल्लांना पकडण्यात आले होते.