कराड प्रतिनिधी । अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणस्थळी आज गुरुवारी एक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. यावेळी उपोषणकर्त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपोषणकर्त्यांच्या उपचाराकडे येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिरंगाई केली जात आहे. येथील वैद्यकीय डॉक्टरला तत्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच राज्य सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण मुस्लिम बांधवांना द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते जावेद नायकवडी, नवाज सुतार, आनंदराव लादे यांनी केली आहे.
कराड येथील शासकीय कार्यालयासमोर आज गुरुवारी समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणकर्त्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषद सुरु असताना एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. त्याला अचानक उलट्या होऊ लागल्यामुळे त्यास रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी घडलेल्या प्रकारानंतर उपोषणस्थळी एकाच धावपळ उडाली.
कराडात समतापर्व संयोजन समितीच्या उपोषणात एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
कराड तहसील कार्यालयासमोर ३ दिवसांपासून उपोषण सुरू
उपोषणकर्ते आक्रमक; वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा निषेध pic.twitter.com/t0rJRaz0Eq
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2023
यावेळी जावेद नायकवडी यांनी उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केला जात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही कराड येथे अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्यचे संरक्षण मिळावे या मागणीसाठी ३ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस सुरु आहे. ३ दिवसांपूर्वी ज्या घटना घडल्या आहेत. त्याचा या उपोषणाचा व घटनांचा काहीच संबंध नाही. आमच्या असलेल्या प्रमुख मागण्या या शासनाने तत्काळ मंजूर करून द्याव्यात. जोपर्यंत मागण्या मजूर करून दिल्या जात नाहीत. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.
यावेळी आनंदराव लादे व नवाज सुतार यांनी देखील उपोषणातिल इतर मागण्यांसंदर्भात व आतापर्यंत कराड तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या पाठींब्याच्या विषयी माहिती दिली. दरम्यान, आज उपोषणस्थळी घडलेल्या घटनेनंतमुळे या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्याकडे प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले.