सातारा प्रतिनिधी । सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील बुरडाणी गावातील एका हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती प्रशासनास दिली असून अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर तालुकायत गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या दरम्यान, आज सकाळीच्या सुमारास तालुक्यातील तापोळा येथील बुरडानी नावाच्या गावात शेलार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलला अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरू लागल्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास तसेच अग्निशामक दलास दिली.
हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तापोळा येथील बुरडानी गावाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तर स्थानिक नागरिकांकडून संबंधित हॉटेलला लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे पर्यटन केले जात आहेत.