कराड प्रतिनिधी | मराठा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी लढणार्या मनोज जरांगे पाटील यांनी सगसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसह मराठा समाजावरील अन्याया विरोधात कराड शहरात शुक्रवारी मराठा समाज बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत सुमारे 150 ट्रॅक्टर सहभागी करण्यात आले होते. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ही रॅली समाप्त करण्यात आली.
याच रॅलीचा एक भाग म्हणून सातार्यात 10 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढली जाणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांमध्ये जनजागृती व्हावी, त्याचबरोबर तहसील कार्यालयात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे व कुणबी दाखले काढताना होणारा त्रास लक्षात घेत दोन ऑगस्टला तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला होता.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी ही रॅली कराड शहरातून काढण्यात आली. ही राहिली बैल बाजार रोड येथे सुरू होऊन तेथून शाहु चौकातुन पेट्रोल पंपा समोरून दत्त चौक, मार्गे कृष्णा नाक्यावरून पुन्हा दत्त चौकातून प्रशासकीय इमारती समोर नेण्यात आली. तेथे उपस्थित मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर प्रांताधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला.