नोएडातल्या युवकाकडून जिल्ह्यातील युवतीचा विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नोएडा येथील कंपनीत नोकरीला असलेल्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय युवतीचा विनयभंग आणि कुटुंबीयांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी संकल्प जैस्वाल याच्यावर फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी युवती सध्या गावी असून ती वर्क फ्रॉम होम करते. संशयिताने युवतीसह तिच्या कुटुंबियांना फोनवरुन धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा येथील २७ वर्षाची युवती ही नोएडा येथील एका कंपनीत काम करते. तिचे काम वर्क फ्रॉम होम असे आहे. ती घरातून काम करत असताना नोएडा येथील संकल्प जैस्वाल हा युवक हा तिला सप्टेंबर २०२२ पासून ते १८ मे २०२४ पर्यंत सतत फोनवरुन टॉर्चर करायचा. तो कंपनीतला तिचा वरिष्ठ अधिकारी आहे. त्याने फिर्यादी युवतीच्या मोबाईलवर फोन करुन तसेच व्हॉट्सअपवर तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. युवतीने त्याला आपले लग्न ठरले असल्याचे सांगितले. तरीही त्याने तिच्या आई, वडील, भाऊ, चुलतीला फोन करुन तिची बदनामी केली. शिवीगाळ केली म्हणून तिने त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.