कराड प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली असून या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कराड येथे घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव असून ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या दि. १३ रोजी शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळत होणाऱ्या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपनेत्या छायाताई शिंदे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कराड येथे उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा घेण्यात आलेला आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामेळाव्यात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.