फलटण परिसरात जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणारी 4 जणांची टोळी दोन वर्षाकरीता तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांकडून नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणाऱ्या ४ इसमांच्या टोळीला पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

टोळी प्रमुख १) तौफिक इम्तियाज कुरेशी, (वय २३) टोळी सदस्य २) इलाही हुसेन कुरेशी, (वय २५) ३) अरबाज इम्तियाज कुरेशी, (वय २८), ४) इनायत हुसेन कुरेशी, (वय २७, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीसानी दिलेली माहिती अशी की, टोळीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० हे कायदे लागु असताना आणि सदर कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतुक करणे, कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणेस मनाई असताना देखील यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करताना मिळुन आले.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल महाडीक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण. श्री. सुनिल महाडीक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांनी केली होती.

सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर १) तौफिक इम्तियाज कुरेशी, २) इलाही हुसेन कुरेशी, ३) अरबाज इम्तियाज कुरेशी, ४) इनायत हुसेन कुरेशी यांची सुनावणी झाली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३१ उपद्रवी टोळयांमधील १०० इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०३ इसमांना असे एकुण १३१ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कायदयाअंतर्गत १ इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असुन भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोहवा वैभव सुर्यवंशी, पोना श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.