पाचगणीतून पॅराग्लाइडिंग करत भरकटलेला फ्रेंच नागरिक 6 तासानंतर आटपाडीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणीत नुकतेच पॅराग्लाइडिंग सुरु करण्यात आलेले आहे. याचा आनंद परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात लुटत आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाचगणीतून भरकटलेले फ्रेंच पॅराग्लाइडर स तासानंतर आटपाडी तालुक्यातील दिघंचीयेथे एका शेतात उतरला. हि घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

सुट्टी सुटी घालवण्यासाठी भारतात आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी आल्यानंतर त्याला येथील पॅराग्लाइडिंग करण्याचा मोह आवरला नाही. त्याने पाचगणीतून थेट पॅराग्लाइडिंग आकाशात झेप घेतली. पॅराग्लाइडिंग करत असताना तब्बल सहा तास तो भरकटला. आटपाडी तालुक्यातील आवळाई रस्त्यावरील मोरे यांच्या शेतात तो कसाबसा सायंकाळच्या सुमारास उतरला. तो उतरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली हाेती. युवकांनी पाहुणचार करून या परदेशी पाहुण्याला खासगी माेटारीतून पाचगणीस रवाना केले.

मागील आठवड्यातही पिअर अलेक्स भरकटून सांगोला तालुक्यातील इटकी येथे आला होता. सुट्टी घालवण्यासाठी अनेक फ्रेंच नागरिक भारतात येतात. पॅराग्लाइडिंगसाठी सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पोहोचतात. पॅराग्लाइडिंग हा धाडसी लोकांचा छंद आहे. त्यासाठी पाचगणी येथे परदेशी लोकांची माेठी गर्दी असते. अनेकदा वाऱ्याचा अंदाज न आल्याने पॅराग्लाइडर भरकटतात. असाच प्रकार सोमवारी पियर अलेक्ससोबत घडला. पाचगणी येथून निघाल्यानंतर तब्बल सहा तास ताे हवेत भरकटला.