कराड प्रतिनिधी । कराड – ओगवाडी रोडवरील सैदापूर कालव्यावरील मालवाहतूक टेम्पोने दोन वाहनासह एका दुचाकीला धडक दिल्याने एकजण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या अपघात टेम्पो कठड्याला धडकून आडवा राहिल्याने काहीकाळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड हून ओगलेवाडीकडे एक टेम्पो (क्रमांक MH 10 AQ 4752) निघाला होता. यावेळी टेम्पो सैदापूर कॅनॉलवर आला असता टेम्पोतील चालकाचे टेम्पोवरील अचानक नियंत्रण सुटले. यावेळी टेम्पोच्या समोरून कराडच्या दिशेकडे एक स्विफ्ट कार, दुचाकी आणि ट्रॅक्टर अशी वाहने निघाली होती. समोरून निघालेल्या कारला धडक दिल्यानंतर पुढे टेम्पोने ट्रॅक्टर आणि दुचाकीला जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर टेम्पो रस्त्यालगतच्या कठड्यास जाऊन धडकून आडवा झाला. कॅनॉलवरील रस्त्यावर टेम्पो आडवा झाल्याने वाहतूक ठप्प झाली.
टेम्पोची धडक इतकी भीषण होती की या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. तर अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर कराड शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत केली.