कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यातील मृत कोल्ह्यास शनिवारी सकाळी वन विभागाने ताब्यात घेतले.
कराड – ढेबेवाडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्यापासून वाहनांचा वेग जास्तच वाढला आहे. या मार्गावरून अती वेगाने जाणाऱ्या तसेच येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. परिणामी कमी वेळेत लवकर वाहने पोहचत आली तरी हा मार्ग वन्य तसेच पाळीव प्राण्याबरोबरच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील धोकादायक व जीवघेणा ठरत आहे.
या मार्गावर आतापर्यंत अनेक वण्यप्रण्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तसेच दुचाकी – चारचाकी अपघातात अनेक जणांचे जीव गेले आहेत. दरम्यान, कराड ढेबेवाडी मार्गावर ढेबेवाडी फाटा येथील कृष्णा सरिता बझार समोर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे याची त्यावेळी कोणालाच कल्पना नव्हती.
कराड ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू pic.twitter.com/UKKWZPwa3C
— santosh gurav (@santosh29590931) September 23, 2023
शनिवारी सकाळी जेव्हा मृत कोल्हा रस्त्यकडेला पडल्याचे नागरिकांनी पाहिले असता त्यांनी व सर्पमित्र गणेश काळे यांनी याची माहिती तत्काळ वन विभागास दिली. यानंतर त्याठिकाणी मलकापूर वन रक्षक कैलास सानप, वनसेवक भरत पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मृत कोल्हयास ताब्यात घेतले.