सातारा प्रतिनिधी । रस्त्यात गाडी उभी केल्याच्या वादातून साताऱ्यातील कमानी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री एकावर गोळीबार करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गोळीबार करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गोळीबारामुळे कमानी हौद परिसरात खळबळ
साताऱ्यातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. शेटे चौक ते कमानी हौद रस्त्यामध्ये गाडी उभी केल्याच्या कारणावरून विशाल वायदंडे याने जाब विचारला. यावरून वायदंडे आणि हर्षद शेख यांचा वाद झाला. हर्षद शेख याने धीरज ढाणे यास बोलावून घेतले. धीरज ढाणे हा चार साथीदारासह तेथे आला. त्याने विशाल वायदंडे याच्यावर पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले.
एक संशयित ताब्यात
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून गोळीबार करणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कमानी हौद परिसर आणि सातारा शहरात खळबळ उडाली आहे. विशाल वायदंडे हा घटनास्थळावरून पळून गेल्याने वाचला.
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
विठ्ठल मधून गोळ्या झाडून एकाच्या हत्तीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयतांपैकी एका च पोलिसांनी ताब्यात घेतली असून पळून गेलेल्या अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.