सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील राजवाडा या वर्दळीच्या ठिकाणी युवकांच्या दोन गटात राडा झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाच्या राड्याच्या प्रकारानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी नागरीकांतून केली जात आहे. सातारा पाेलिस दलाने घटनेतील युवकांचा शाेध सुरु केला आहे.
सातारा शहरातील राजवाडा परिसर हा शहरवासियांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आवडता परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात गाेलबाग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान आदी विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. या परिसरात खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे देखील असता. यामुळे या परिसरात कायम वर्दळ असते. दर्या, सोमवारी रोटरी आठ वाजण्याच्या सुमारास येथील प्रतापसिंह उद्यान येथे दाेन गटातीळ तरुणांमध्ये अचानक वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.
अचानक तरुणांच्या दोन गटात मारामारीच्या प्रकार सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तरुणांची मारामारी पाहण्यासाठी परिसरात बघ्यांची गर्दी जमली. काहींनी त्या तरुणांच्या मारामारीचे आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. तर काहींनी फोटो काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा करु लागले आहेत.