पोलीस मुख्यालयातील महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या विवाहित महिला कॉन्स्टेबलने सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील फलटणमधील नागेश्वरनगर – चौधरवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ऋतुजा सुशांत रासकर (वय २२), असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋतुजा यांचे सासरे बाळू रासकर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ऋतुजा रासकर या मुंबई शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होत्या. त्या नागेश्वरनगर, चौधरवाडी येथे त्यांच्या घरी आल्या होत्या. पाऊस पडू लागल्याने सुरुवातील बाहेर वाळत टाकलेले कपडे ऋतुजा यांनी घरात नेले. काही वेळाने पाळीव मांजर बांधायचे असल्याने त्यांचे सासरे बाळू रासकर हे ऋतुजा रासकर यांच्या खोलीकडे गेले. त्यांनी ऋतुजा यांना हाका मारल्या, मात्र कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता सून ऋतुजाने गळफास घेतल्यांचे निदर्शनास आले.

महिला पोलीस असलेल्या ऋतुजा रासकर यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे नागेश्वरनगर-चौधरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक करीत आहेत.