कराडच्या स्मशानभूमीत मृत्युनंतरही यातना…,’लोकशाही’ने केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये कराड शहरासह नजीकच्या गांवामधील पार्थिव दहनासाठी आणले जाते. दरम्यान, रात्रीच्यावेळी या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्याने याठिकाणी कराड पालिकेतर्फे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पार्थिव दहन करण्याबाबत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात लोकशाही आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाला निर्णय रद्द करावा अशी निवेदनाद्वारे मागणी आज करण्यात आली.

यावेळी कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष ॲड. विद्याराणी साळुंखे, सचिव नरेंद्र पवार, सहसचिव व मुसद्दीक आंबेकरी, खजिनदार रवींद्र मुंढेकर, सह खजिनदार राकेश शहा यांचेसह माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे, सुहास पवार, उदय हिंगमिरे, शिवाजी पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, प्रविण पवार, अजय सूर्यवंशी, भारत थोरवडे, सोहेब सुतार, अशपाक मुल्ला, दीपक कटारिया, साबीर आंबेकरी, अमरसिंह बटाणे, आदिल आंबेकरी, निहाल मसुरकर, गणेश हिंगमिरे, सोहेल बारस्कर, अबुकर सुतार, प्रताप भोसले, राहुल भोसले, मंगेश वास्के, गणेश कांबळे,सचिन चव्हाण, रोहित वाडकर, चांद पालकर, विनायक पाटील, अहमद मुल्ला, प्रशांत शिंदे,अजिंक्य देव, संजय मोरे, रफिक मुल्ला, सतीश भोंगाळे, रमेश सातुरे आदी उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये दहनासाठी पार्थिव आणण्यासाठी वेळेचे घातलेले बंधन अत्यंत चुकीचे, जनतेच्या व समाजाच्या भावनांशी खेळ करणारे आहे. कारण काही नागरिक बंधु-भगिनींचे देहावसान घरी वृध्दापकाळाने, काहीचे अपघाची निधन, काहीचे दुर्धर अशा आजाराने रात्री-अपरात्री निधन होते. अशावेळी नातेवाईकांना पार्थिव जास्त वेळ घरी ठेवणे भावनिक व आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. आपण जर वेळेचे बंधन घातले तर ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा नागरिकांनी आपल्या नातेवाईकांचे पार्थिव कोठे ठेवायचे? त्यांना ते दवाखान्यात ठेवणे परवडणारे नाही.

सध्याची महागाई पाहता नातेवाईकांना दवाखान्याचे बिल भरणे देखील शक्य नसते. अशावेळी आपण वेळेचे बंधन घालून महागाईत आणखी भर घालत आहात. तसेच योग्य वेळेत दहन न करता आल्याने होणारी कुटुंबांतील सदस्यांची भावनिक व मानसिक कुचंबना याचा विचार करता हे बंधन सामाजिकदृष्ट्या अनिष्ट व घातक आहे. सबब या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तरी आपणांस लोकशाही आघाडी व कराड शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येते की सदर वेळेचे बंधन त्वरीत रद्द करावे, अन्यथा लोकशाही आघाडीचेवतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.