कराडच्या कोयना नदीकाठी आढळली 10 ते 12 फूट लांबीची मगर; पहा व्हिडिओ

0
92
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने नदीत पाण्याच्या प्रवाहासोबत जीवजंतू देखील येत आहेत. शनिवारी दुपारी कराडच्या कोयना नदीपात्रात सुमारे दहा ते बारा फूट लांबीची भली मोठी मगर दिसून आली. या मगरींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

कराड येथील कोयना नदीत आढळून आलेल्या मगरीबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत असणाऱ्या मळीच्या शिवारात कोयना नदीकाठी एका युवकाला सर्वप्रथम हि मगर दिसली. त्यानंतर पुन्हा भुईकोट किल्ला व शुक्रवार पेठेतून कोयना नदीच्या काठावर नदीतून बाहेर पडताना काही नागरिकांच्या दृष्टीस ही मगर पडली. गणेशोत्सव जवळ आला असल्याने कराड शहरातील शुक्रवार पेठेत सध्या गणेश मूर्ती बनवण्याचे काम कुंभार समाजातील मूर्तिकारांकडून केले जात आहे.

मूर्तीचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी या ठिकाणी मूर्तिकारांनी शेड उभारले आहे. त्या शेडमध्ये काही मूर्तिकार मूर्ती बनवत होते. त्यातील काहीजण कोयना नदीकाठी शनिवारी दुपारच्या वेळी फिरण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना कोयना नदीपात्रातून वरती येताना मगर दिसून आली. काही जणांना ही मगरीचे दृश्य आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रित केले. संबंधित चित्र व व्हिडीओ शाओशाळ मिडिया व्हाऊयरल झाले असून याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

मगर दिसल्यास काय करू नये?

  • मगर दिसल्यास वन विभागाला 1926 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्या.
  • लोकांना मगरी पासून दूर ठेवावे.
  • पाण्यात उतरून मगरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.
  • मगरीला डिवचू नका, दगड मारू नका किंवा काठीने मारू नका.
  • गावकऱ्यांना मगर दिसत असलेल्या जागे बाबत सतर्क करा
  • मगर दिसत असलेले क्षेत्र प्रतिबंधित करा.
  • मगरीजवळ इतर लोक गर्दी करू नयेत ह्याची काळजी घ्या.
  • वन विभागाच्या सुचनेशिवाय मगरीला घेरण्याचा प्रयत्न करू नका.
  • वन विभागाचे कर्मचारी व इतर मदत येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून मगरीवर लक्ष ठेवा.
  • जवळ नदीपात्र असेल तर मगरीला नदीपात्रात जाण्याचा मार्ग मोकळा करून द्या.

घाबरून जाण्याची गरज नाही : रोहण भाटे

आज कोयना नदीपात्रात आढळून आलेल्या मगरीबाबत मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना प्रतिक्रिया दिली. पुराच्या पाण्याने मगरीच्या उन्हाला पडायच्या जागा डिस्टर्ब झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व नवीन जागेत आढळून येत आहे. पुरानंतर काही दिवसांनी मगरी त्यांच्या पूर्वीच्या वस्थीस्थानाकडे निघुन जातील. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.