ढेबेवाडी-पाटण मार्गावर दिवशी घाटात पुन्हा कोसळली दरड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाची रिपरिप सुरू असून ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. घाटात छोट्या मोठ्या दरडी पंडत आहेत. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ढेबेवाडीकडून पाटणकडे कामानिमित्त निघालेल्या पोलिस पाटलांच्या गाडीच्या समोरच दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

दिवशी घाटातून बाहने चालवताना वाहनधारक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे दरडी पडत असल्याने घाटातून प्रवास करतानां धोक्याचे झाले आहे. दरड कोणत्याही क्षणी कोसळेल हे सांगता येत नाही. या घाटामध्ये अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या दरडी यापूर्वी कोसळल्या आहेत. सध्या या घाटात रस्त्याचे रुंदीकरण व धोकादायक दरडी काढण्यात आल्या असल्या तरी अधूनमधून घाटात दरडी कोसळंत असतात. त्यातच या घाटातील मालदन हद्दीतील घाटात असलेल्या दत्त मंदिरापासून मालदनपर्यंत रस्ता रुंदीकरण व धोकादायक दरडी काढण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी धोकादायक स्थिती आहे.

प्रवासी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी डोंगराचा सुटलेला भाग कधीही ढासळण्याची शक्यता आहे. दिवशी घाट अरुंद व वळणा वळणाचा असल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोक्याचा बनत आहे.

प्रवास करताना जीवावर दगड

ढेबेवाडी पाटण ही रहदारी सुखकर व्हावी यासाठी या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तरीदेखील पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे डोंगरकपारीतून लहान मोठे- दगडगोठे रस्त्यावर येत असतात. अगोदरच या मार्गात अनेक ठिकाणी अपघाताची ठिकाण आहेत. त्यातच दरडीची भर पडल्याने प्रवासी वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, सध्या पाऊस सुरू असल्याने दरड कधीही कोसळेल अशी स्थिती आहे.