कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय NGO महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनच्या वतीने बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा कराड येथे बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सुपर मार्केट, शनिवार पेठ,नगर परिषद शाळा क्रं.७/१२ येथे दुपारी १२.४० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बिगर हुंडा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित केला असल्याची माहिती शंभूरत्न परिवर्तन फौंडेशनचे संस्थापक सचिव विकासभाऊ सुर्यवंशी यांनी आज दिली.
कराड येथे शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस भानुदास वास्के, दत्तात्रय दुपटे उपस्थित होते. यावेळी सचिव विकासभाऊ सुर्यवंशी यांनी सोहळ्याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी विकासभाऊ सुर्यवंशी म्हणाले कि, काळाच्या गरजेनुसार अशा विवाह सोहळ्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या सर्व गोष्टींची बचत होऊन विनाकारण होणाऱ्या प्रचंड खर्चाचे बचत होणार आहे. म्हणूनच हा सामाजिक उपक्रम कराड येथे शंभुरत्न परिवर्तन फौंउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे.