सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील कैकाड गल्लीत सोमवारी एक अनोखी घटना घडली होती. त्यामुळे सातारकर चांगलेच घाबरले होते. रात्रीच्यावेळी 11 वाजता साताऱ्यातील कैकाड गल्लीत सोमवारी कोपऱ्यावरचं असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका बाईचा पुतळा ठेवण्यात आला होता. तो पुतळा नेमका कुणी ठेवला? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा करणार्याचा पोलिसांनी शोध घेत याप्रकरणी अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
साताऱ्यातील कैकाड गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एक भयावह पुतळा ठेवण्यात आला होता.बसवलेल्या त्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदरही होता. तसेच त्या पुतळ्याला मेक अप केलं होतं. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता. रात्री 11 वाजताच्या अंधाऱ्या रात्री हे असं काही तरी समोर आलं तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही. साताऱ्याच्या कैकाड गल्लीतल्या दोन बायका शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील तो पुतळा बघून घाबरली.
अचानक बायकांच्या किंकाळ्यांच्या आवाजाने आख्खी कैकाड गल्ली जागी झाली आणि मग शौचालयात आलेल्या या भुताची चौकशी सुरु झाली. मग काही जणांनी तो पुतळा बाहेर काढला. चेष्टा आणि प्रँक करण्याच्या नादानंतर काही बायकांना तर तापही आला होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.