सातारा प्रतिनिधी । सातारा – लातूर या मार्गावर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, लवकरात लवकर काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून संगम माहुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत हवालदार विश्वनाथ मेचकर यांच्या फिर्यादीनुसार सातारा ते लातूर महामार्ग संगममाहुली येथे दि. ५ रोजी सकाळी ११. १५ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत अडवून धरल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये रमेश संपत बोराटे, सचिन जगताप, अविनाश कोळपे, प्रकाश माने, निखिल यादव, प्रमोद फल्ले, कपिल राऊत, डॉ. रमाकांत साठे, वैभव अरविंद शिंदे, पंकज जयवंत शिंदे, नरेंद्र दिलीप फाळके, प्रतिक शिंदे, संदीप हिंगे, चंद्रकांत शिंदे (रा. सोनगाव सं. लिंब), निरंजन पवार, अजित बर्गे, बाळकृष्णं जाधव, प्रशांत सत्यवान जाधव, वैभव पवार, निरंजन कांबळे, निरंजन पवार, निलेश डफळे, दीपक चव्हाण, हणमंत आढाव, अमर आढाव, सतीश वंजारी (सर्व रा. क्षेत्रमाहुली), विशाल गायकवाड, सुर्यकांत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, शुभम बल्लाळ, व इतर ३० जणांचा समावेश आहे. या सर्वानी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन रस्ता रोको केला आहे. या प्रकरणाचा तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.