साखरपुड्यात केला लाखाचा खर्च मात्र, ऐनवेळी लग्न मोडलं; डॉक्टरसह 3 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका नामवंत हाॅटेलमध्ये धुमधडाक्यात साखरपुड्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या साखरपुड्यात 9 लाख 63 हजार रुपये इतका खर्च मुलीकडच्यानी केला. मात्र, साखरपुड्यानंतर जेव्हा लग्नाची तारीख ठरवण्याची वेळ आली तेव्हा ऐनवेळी लग्न करण्यास वर पक्षांकडील लोकांनी नकार दिला.
याबाबत मुलाकडील मंडळींनी फसवणूक केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी एका डाॅक्टरसह तिघांवर फणवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

डाॅ. गिरीश बाळकृष्ण कदम, बाळकृष्ण बाजीराव कदम, शीला बाळकृष्ण कदम (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे ७० वर्षांचे असून, ते मूळचे मुंबईचे आहेत. त्यांच्या डाॅक्टर असलेल्या मुलीसोबत वरील संशयितांनी साताऱ्यातील एका नामवंत हाॅटेलमध्ये साखरपुडा केला. या साखरपुड्यात मुलीच्या वडिलांनी 9 लाख 63 हजार रुपये खर्च केला. मात्र, त्यांच्या मुलीशी लग्न न करता त्यांची फसवणूक केली. यामुळे सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसानही झाले असल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पालवे हे अधिक तपास करीत आहेत.