बोगस विवाह लावून घातला 4 लाख 25 हजाराचा गंडा; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विवाह होत नसल्याने विवाह इच्छुक तरुण वधुवर सूचक केंद्रात जाऊन आपले नाव देतात. त्याठिकाणी ठराविक पैसे भरून आपले बायोडाटा देतात. मात्र, त्यातील काहींचे विवाह होतात तर काहींचे राहतात. मात्र, अशामध्ये काहींची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशीच फसवणूक झाल्याची घटना कराड तालुक्यात घडली असून वधुवर सूचक असल्याचे सांगत विवाहासाठी दोन युवकांकडून 4 लाख 25 हजार रुपये घेत त्यांचा बोगस विवाह लावलयाचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारणी कराड तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षा जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर, जि. सांगली), शंकर थोरात (रा. वसंतगड, ता. कराड), पूजा ऊर्फ स्नेहल पाटील व पूजा यादव (दोघीही रा. इचलकरंजी – जवाहरनगर, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रमेश तानाजी नांगरे (रा. शेखरवाडी, ता. वाळवा) या युवकाने पोलिसात चौघांविरोधात तक्रार दिली केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील वसंतगड गावात राहणारी शंकर थोरात हि व्यक्ती विवाह करून देत असल्याची माहिती वाळवा तालुक्यातील शेखरवाडीतील रमेश नांगरे यांना मिळाली. त्यानुसार शेखर व त्याच्या चुलत्यांनी वसंतगडमध्ये शंकर थोरात व वर्षा जाधव या दोघांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नांगरे याच्याकडून सुरुवातील 2 लाख 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर संबधितांनी दोघांना दि. 15 एप्रिल रोजी पूजा पाटील या मुलीला दाखविले.

मुलगी पसंद असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉलमध्ये त्या दोघांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती. आठव्या दिवशी पूजेसाठी पूजा हिची आई, मावशी, मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा शेखरवाडीला येऊन पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो,असे सांगून पूजाला घेऊन गेले. दरम्यान, दोन ते तीन दिवसानंतर विश्रामबाग येथील सांगली पोलिस ठाण्यात वर्षा जाधव, शंकर थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती रमेश नांगरे याला मिळाली.

त्यामुळे संशय आल्याने रमेश यांनी पूजा यादव हिच्या मोबाइलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी येणार?,अशी विचारणा केली. त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच पत्नी पूजा सासरी न आल्यामुळे आपलीही फसवणूक झाल्याचे रमेश नांगरे यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात जाऊन संबधितांविरोधात फिर्याद दिली.

साक्षीच्या साहाय्याने युवकाचीही फसवणूक

कराड तालुक्यातील येणके या गावातील एका युवकाची या टोळीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. येणके येथील एका युवकाकडून २ लाख रुपये घेत त्याचा १५ डिसेंबर २०२२ रोजी साक्षी साळुंखे या युवतीशी विवाह लावून दिला होता. विवाहानंतर महिनाभर साक्षी येणके येथे राहिली. मात्र, बहिण आजारी असून तिची इंदापूर येथे भेट घेऊन येते, असे सांगून साक्षी इंदापूरला गेली. ती परत न आल्यामुळे संबंधित युवकाने कराड तालुका पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती.