हॉटेल व्यावसायिकाकडे 3 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‘तहसीलदारांकडे तक्रार अर्ज करून तुझे हॉटेल सील करेन’, अशी धमकी देऊन ३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. भीतीपोटी रोख १० हजार रुपये दिले असल्याचेही तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सचिन महादेव कासुर्डे (वय ४३, रा. शाहूनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहन अरुण राजेशिर्के, संदीप शिंदे, मोरे (पूर्ण नाव, वय, पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार सचिन कासुर्डे यांचे आरटीओ चौक परिसरात हॉटेल आहे.

संशयित तिघांनी आपापसात संगनमत करुन खंडणीची मागणी केली. ‘तहसीलदार यांच्याकडे तुझ्या हॉटेलची तक्रार करुन सील करेन. तक्रार नको असेल तर ३ लाख रुपये द्यायचे’, असे म्हणून धमकी दिली. यामुळे कासुर्डे यांनी भीतीपोटी १० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम ७ तारखेपर्यंत द्यायचे, अन्यथा गोळी घालून मारण्याची धमकीही दिली. यामुळे तक्रारदाराने संशयितांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.