सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नशेतून व्हिडिओ रेकॉर्ड करत स्टंटबाजी केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकारणी हुमायून तांबोळी, एजंट संतोष शिंदे (पाटखळ), रेकॉर्डिंग करणारा भोसले याच्यासह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात काही युवकांनी थेट कर्मचाऱ्याला दारुच्या नशेत धमकी देत धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा केला. त्याचबरोबर अंतिम दस्ताऐवज असलेली कागदपत्रे चोरली. दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्ड करून नशेत केलेली स्टंटबाजी सोशल मीडियावर व्हाईलर करण्याचे प्रकरण अंगलट आले असून यात सहभागी असलेल्या सर्वांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यालयातील मुख्य लेखापाल सतिश शिवणकर कामकाज करत असताना हुमायून तांबोळी याने मद्याच्या नशेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, खोटे आरोप करत कागदपत्रे अंगावर फेकली. तसेच कामकाजामध्ये अडथळा निर्माण करत स्टंटबाजी केली. ही नियोजनबध्द स्टंटबाजी व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यातील काटछाट करून सोशल मीडियावर व्हाईलर करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नाहक बदनामी केली.

या प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून हुमायून तांबोळी याने कार्यालयातील काही कागदपत्रे चोरल्याचे निदर्शनास आले असून याबाबत सतिश शिवणकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात स्टंटबाजी करणारा हुमायून तांबोळी, त्याचा हस्तक एजंट संतोष शिंदे (पाटखळ), रेकॉर्डिंग करणारा भोसले, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात 353, 380, 500, 504, 506, 332, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.