साताऱ्याच्या भरतगाव नजीक पुणे – बंगळूर महामार्गावर मालट्रक पलटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर मालट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने या ठिकाणी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा या लेनवर गुरुवारी एक ट्रक पलटी क्रमांक (KA 63 A 3225 )झाला. या घटनेमुळे महामार्गावरील कराड ते सातारा मार्गे जाणाऱ्या लेनवर वाहतूक ठप्प झाली. अपघात झाल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी ट्रकच्या दिशेने धाव घेतली. काही नागरिकांनी महामार्ग देखभाल विभागाचे पोलीस व बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांना खबर दिली.

या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे, पोलिस उपनिरीक्षक राजाराम निकम, दीपक कारळे यांच्यासह सर्व पोलिस स्टाफ अपघातस्थळी दाखल झाले. अपघात विभागाचे पोलिस व वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करत क्रेनच्या साहाय्याने मालट्रक बाजूला हटवला. या अपघातात मालट्रक चालक जखमी झाला असून, मालट्रकचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही अवजड वाहने, इतर वाहने व दुचाकीस्वार ट्रक ट्रॅफिकमधून बाहेर निघताना विरुद्ध तून, दिशेने निघाल्याने व एकाच लेनवर सहा पदरीकरणाच्या कामामुळे अवजड वाहतुकीचा खोळंबा झाला.