पुणे- बंगळूर महामार्गावर चालत्या कारने घेतला पेट; पारगाव खंडाळा हद्दीत अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. रविवार रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- बेंगलोर महामार्गावरून काही जण कारने निघाले होते. त्यावेळी त्यांची कार पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत आली असता. कारमधून अचानक धूर येऊ लागला. पुढे काही कळणार इतक्यात कारने अचानक पेट घेतला.

कारने अचानक पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करुन सर्व प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर काही क्षणातच कार जळून खाक झाली. खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एमआयडीसीमधील अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर महामार्गावर सुमारे अर्धा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.