ठाकरे गटाला आणखी एक धक्का; उद्धव ठाकरेंच्या गटातील मोठा नेता जाणार शिंदे सेनेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून राज्यातील राजकारणात उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. शिंदे गटाकडून ठाकरेंच्या सेनेतील एक-एक नेते फोडले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेल्यानंतर अनेक धक्के उद्धव ठाकरे यांना बसले आहे. आता आणखी एक धक्का ठाकरे यांना बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार आहे.

विधान परिषदेतील शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत नुकतेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेतील विप्लव बाजोरिया हे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती मिळाली असून यामुळे विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची संख्या अजून कमी होणार आहे.

ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणजे नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहिले जाते. शिवाय त्या उपनेत्याही आहेत. तसेच विधान परिषदेच्या उपसभापतीसुद्धा असल्यामुळे त्यांना ठाकरे गटात महत्वाचे मानले जाते. आता त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा होऊ लागल्यामुळे यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागणार आहे.