अंगावर वीज पडून हजारमाचीच्या 28 वर्षीय युवकाचा झाला जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मसूर-उंब्रज रस्त्यावरील रेल्वे गेट उड्डाणपुलाजवळ लघुशंकेसाठी उभा राहिलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रसाद अशोक खुटाळे (वय २८, रा. सिद्धिविनायक कॉलनी, मळावॉर्ड, हजारमाची) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हजारमाचीतील राहणाऱ्या प्रसाद खुटाळे याचे कोल्हापूर व तासवडे येथे काजू प्रोसेसिंग युनिट आहे. रविवारी सायंकाळी प्रसाद मसूर येथील पाहुण्यांकडे गेला होता. त्यानंतर तो. उंब्रज रस्त्याने तासवडेकडे जाण्यासाठी निघाला. मात्र उंब्रजमधून पुन्हा तो घरी जाण्यासाठी मसूरकडे आला. सायंकाळी सात ते सव्वासात वाजण्याच्या सुमारास मसूर व परिसरात विजांचा, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी उंब्रजकडून मसूरमार्गे हजारमाचीला निघालेल्या प्रसादने मसूर रेल्वे गेट उड्डाणपुलाजवळ रस्त्याकडेला दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी उभा राहिला.

त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मसूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस व स्थानिकांच्या मदतीने त्यास उपचारासाठी कराड येथील कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन केले असता डॉक्टरांनी सदरचा युवक अंगावर वीज पडून हृदयाला धक्का बसून मयत झाल्याची माहिती दिली. प्रसाद खुटाळे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, चुलता, चुलती, पुतणे असा परिवार आहे.