सातारा प्रतिनिधी । ऐतिहासिक आणि निसर्गाने नटलेल्या साताऱ्यातील पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल १२ कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून शासन आणि पालिकेच्या निधीतून हा पुर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पाचे महत्व म्हणजे यात पर्यटकांना भुरळ घालणारा आयकॉनिक ब्रीज, अॅपी थिएटर, व्हिहींग गार्डन असणार आहेत. साधारण या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. करंजे, शाहुपुरीसह साताराय येथे राहणाऱ्या नागरिकांना हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्राप्त होणार आहे.
साताऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशांचे श्रध्दास्थान आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या पेढ्याचा भैरोबा मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचे सुशोभीकरण काम सध्या संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पास पालिकेकडून माझी वसुंधरा योजनेची जोड देण्यात आलेली आहे. याठिकाणी येणाऱ्या विविध प्रजातीच्या पशू पक्षांचा विचार करून आणि सौंदर्यांची भूरळ वाढवणारी १५ हजार स्वदेशी वृक्षलागवड केली जाणार आहे.
नेमका कसं असणार आयकॉनिक ब्रिज
पेढ्याचा भैरोबा मंदिर येथील मंदिर परिसरात भव्य योगा हॉल, दोन खुली व्यासपीठ, सातारचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ३ उंच स्पॉट, वृक्ष संगोपनासाठी ७५ हजार लिटर पाण्याची टाकी, जॉगिंग ट्रॅक होणार आहे. तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जणू हवेतून चालण्याचा आनंद अनुभूती येईल, असा दोन डोंगर जोडणारा आकर्षक आयकॉनीक ब्रीज असणार आहे.