सातारा प्रतिनिधी | वर्षातून फक्त एप्रिल महिन्यामध्ये एक वेळच अवकाशात पृथ्वीचा उपग्रह असणारा “पिंक मून” हा तारा दिसतो. त्याच्या सोबत गुरु, चंद्र आणि अवकाशातील असंख्य तारे सध्या स्पष्ट दिसत आहेत. माणसाच्या नजरेच्या टप्प्यात न दिसणारे ग्रह तारे आज मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सायं. ७ ते १० या वेळेत विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी “ या, पहा आणि अवकाश विज्ञान जाणून घ्या “, असे आवाहन डॉ.सारंग भोला यांनी केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील रयत सायन्स आणि इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स अँड ऍस्ट्रोफिजिक्स या दोन्ही शाखांच्या कडून सातत्याने विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विज्ञान मागचे विज्ञान समजून घेण्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. जगभरात एप्रिल मध्ये दिसणाऱ्या ” पिंक मूनबाबत प्रचंड उत्सुकता असते.
यावेळी दि. २३ एप्रिल रोजी “ पिंक मून “ हा उपगृह अवकाशात दिसणार असून तो विद्यार्थ्यांना पाहता यावा, यासाठी या दोन्ही शाखांकडून मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी ७ ते १० या वेळेत गोडोली येथील अप्पासाहेब पाटील रयत इंग्लिश मेडियम स्कूल येथे “सेलेरोन ” या दुर्बिणीतून आकाश दर्शन हा उपक्रम आयोजित केला आहे.
अवकाश दर्शन करण्यासाठी सहभागी होण्यास पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी नाममात्र नोंदणी फी रु. १००/- असणार आहे. या बाबत रयत शिक्षण संस्थेच्या सातारा शहर आणि परिसरातील माध्यमिक शाळांमध्ये नोदणी लिंक उपलब्ध आहे. इच्छुकांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर उपक्रम यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, फिजिक्स विभाग प्रमुख डॉ. ए.पी. तोरणे, सायन्स सेंटरचे क्युरेटर सचिन सोनुले हा उपक्रम यशस्वी होण्यासठी परिश्रम घेत आहेत.