महागाई, शेतकरी धोरणांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; कराडमध्ये आज युवा आक्रोश मशाल मोर्चा

0
29
congress protest karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षा घोटाळा, शेतकरी विरोधी धोरणांविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कराड शहरात युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे कराडमध्ये दाखल झाले आहेत. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सोबत ते केंद्र आणि राज्य सरकारच्या काळातील महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील अडचणींची सुद्धा दखल घेतली जात नाही. याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्रातील मोदी सरकार विरोधात देशभरात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसही आता मैदानात उतरली आहे. कराड शहरात मशाल मोर्चा काढून युवक काँग्रेस केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करणार आहे.

प्रदेशाध्यक्ष कराडमध्ये दाखल

दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, असा मशाल मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे गुरूवारी रात्री कराडमध्ये दाखल झाले. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कॉंग्रेसचे कराड शहराध्यक्ष ऋतुराज मोरे आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.