कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मलकापूर ता. कराड येथे आज कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली. तसेच त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जीवंत काडतूस असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जीवन शांताराम मस्के (वय ३०, रा. शुक्रवार पेठ, ता . कराड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मलकापूर येथील छत्रपती शिवाजी चौकात सापळा रचला. या कारवाईत जीवन मस्के रा. शुक्रवार पेठ, कराड या संशयितास ताब्यात घेण्यात अटक करण्यात आले. त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात पूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जीवंत काडतूस असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस दलाकडून कराड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती, टोळ्या आणि गट-तटांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पो.उ.नि. सतिश आंदेलवार, पो.ना. संतोष पाडळे, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, धिरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, मुकेश मोरे आणि सोनाली पिसाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.