स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात कराड पालिकेचा डंका; 17 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

0
241
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून कराड शहरात अनेक स्वच्छतेची कामे करून सातारा जिल्ह्यातील कराड नगर पालिकेने देशात नाव लौकिक मिळवला आहे. केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेतली जाते. सण 2024 रोजी घेतलेल्या स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात पुन्हा एकदा बाजी मारली आहे. शासनाकडून या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा आज निकाल जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये कराड पालिकेने सलग सहाव्यांदा पुरस्कार प्राप्त केला. दि. 17 जुलै रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांनी व राज्यातील नगर पालिकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल आज अधिकृतरितीने जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या पाच राज्यांचा समावेश करण्यात आला असून या पाच राज्यातील 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये कराड पालिकेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

कराड पालिकेने यापूर्वी देखील जेव्हा 2019 व 20 अशी दोन वर्षे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होत देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. तर 2021या वर्षी सहावा तर सण 2022 साली देशात तिसरा क्रमांक मिळवला होता. 2019 मध्ये तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कालावधीत कराड पालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही स्वच्छतेत सातत्य राखल्याने कराड पालिका अव्वल स्थानावर पोहोचली.

तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पालिकेने या स्पर्धेची तयारी केली होती. त्यावेळी कराड पश्चिम विभागात प्रथम आले. आता 2024 सालच्या स्पर्धेत कराडने देशात पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. दि. 17 जुलै रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी पुरस्कार स्विकारणार आहेत