सातारा प्रतिनिधी | राज्यासह देशभरात भोई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र हा समाज सर्वत्र विखुरला गेला असल्यानेच आजवर हा समाज अनेक सुविधांपासुन वंचित राहिता असुन यापुढे या समाजाला आपले हक्क व अधिकार मिळाले पाहिजे यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येवुन शासनाला आपती ताकत दाखवुन देणे गरजेचे आहे, समाज संघटित करण्यासाठी अखिल भारतीय भोई समाज संस्थेने एक चळवळ सुरु केली असुन या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे महासचिव गजानन साटोटे यांनी केले आहे.
सातारा जिल्हा भोई समाजाच्या वतीने विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी शंकरराव कांबळे, तुकाराम वानखेडे, चंद्रकांत लाडे, आनंदराव भोई, हणमंतराव आपटे, बाळासाहेब तकारे, पिंटु भोई, दिलीप आयरे, किशोर आयरे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक करंजे, जिल्हा संघटनेचे राम शिंदे, विकास वंजारी, चंद्रकांत कांबळे, प्रशांत मेळावणे, शशीकांत शिंदे, उमेश गुजर, उषा जाधव, मनिषा कांबळे, मारुती सुपेकर, चंद्रकांत जिरंगे, प्रदिप कारळे, सुनील गुजर आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी साटोटे म्हणाले की, संपूर्ण देशात भोई समाजाची खुप मोठी संख्या आहे. पुर्वी भोई संघटना ही राज्यात काम करीत होती. परंतु राज्याबाहेरही हा समाज मोठ्या प्रमाणावर असुन तो सर्वत्र विखुरलेला आहे. भोई समाजात अनेक पोटजाती असल्याने तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट झालेला आहे. यापुढे संपूर्ण भोई समाज हा फक्त भोई या एकाच जातीने ओळखला जावा पासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील भोई समाज हा काहीसा सधन आहे परंतु विदर्भ, मराठवाड्यातीत हा समाज आर्थिक दुर्बल आहे तर इतर राज्यात हा समाज अशिक्षीतही मोठ्या प्रमाणावर आहे, या सर्वांना एकाच छताखाली यावे लागणार आहे. या समाजाची खुप मोठी संख्या असताना देखीत आजवर हा समाज अनेक सुविधापासुन वंचित राहिला असल्याचे साटोटे यांनी म्हंटले.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील भोई समाज हा पारंपरिक मासेमारी करीत असताना या व्यावसायिक प्रचंड मोठी इतर समाजाची घुसखोरी झाती असुन या समाजाला मासेमारी करण्यासाठी तलाव उपतब्ध होत नव्हते, आम्ही शासन दरबारी पाचा पाठपुरावा करून फक्त भोई समाजाच्या संस्थानाच तलाव उपलब्ध करून देण्याचा अद्यादेश काढावयास लावता आहे. यापुढे मत्सव्यावसायिकांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
यावेळी सातारा जिल्हा भोई समाज संघटनेचे प्रा. रविंद्र कांबळे पानी प्रास्ताविक करताना जिल्हा संघटनेच्या कार्याचा आलेख मांडला. तर माण तालुका भोई समाजाचे अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी कर्नाटक व इतर राज्याप्रमाणे भोई समाजाला एस.सी. प्रवर्गाचा लाभ मिळावा पासाठी संस्थेने प्रयत्न करण्याची मागणी केली.