सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील सासवड झणझणे येथे एका दुसरीतील विद्यार्थ्यांसह 3 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला, परंतु तरडगाव येथे लस उपलब्ध न झाल्याने बारामती येथे न जाऊन विद्यार्थ्याला लसीकरण करावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
सासवड झणझणे येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर सर्वज्ञ सचिन भुजबळ (वय ८) हा खेळत असताना त्यांच्या हाताला व पायाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर साईराज अनपट (१७), रोहित बांदल (२३), तानाजी धायगुडे (५५) यांना चावा घेतल्यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याला मारून टाकले. त्यानंतर सर्वज्ञ याच्यावर बारामती तर अन्य लोकांपैकी एकावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, लहान मुलासह तिघांवर केलेल्या कुत्र्याने हल्ल्याच्या घटनेनंतर सासवड झणझने भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.