सातारा प्रतिनिधी | जुन्या पेन्शन योजनेसह पवित्र पोर्टल रद्द करणे, कमी पटसंख्या असणाऱ्या मराठी शाळा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुले शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण असून या विरोधात सातारा जिल्हा संस्था चालक तसेच शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी आज साताऱ्यात मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवला. साताऱ्यातील गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आलेल्या मोर्चात सातारा जिल्हा संस्थाचालक संघटना माध्यमिक शिक्षक संघटना, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर महासंघ, सातारा जिल्हा ग्रंथपाल संघटना अशा विविध ३६ संघटनांचे पदाधिकारी आंदोलन सहभागी झाले होते.
साताऱ्यातील गांधी मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा गांधी मैदान, मोती चौक, देवी चौक राजपथ मार्गे पोवई नाका तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी अनेक फलकांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये पवित्र पोर्टल प्रणाली बंद करणे, पटसंख्या नाही म्हणून दुर्गम भागातील मराठी शाळा बंद करणे, प्रयोगशाळा सहायकांच्या तत्काळ भरती करणे,
कंत्राटी पद्धतीची शिपाई भरती तातडीने बंद करणे, अन्याय अन्यायकारक संच मान्यता, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सर्व गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत करणे, आरटीई प्रकरणातील प्रतिकृती शुल्क तात्काळ संस्थाचालकांना अदा करणे अशा विविध मागण्या या माध्यमातून करण्यात आल्या.