सातारा जिल्हा परिषदेच्या 16 शिक्षकांना निलंबनाची नोटीस; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

0
622
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या सातारा जिल्ह्यात शिक्षण विभागातील घोटाळा चांगलाच गाजत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्रासह इतर काही चुकीची कागदपत्रे शिक्षकांनी सादर केल्याचे आरोप होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने ५८१ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालयामार्फत सुरू केली आहे. त्यामध्ये बारा शिक्षकांच्या प्रमाणपत्रांमध्ये गैरप्रकार आढळल्याचे तर चार शिक्षक तपासणीसाठी गैरहजर राहिल्याने १६ शिक्षकांना निलंबनाची नोटीस बजावून आठ दिवसात खुलासा देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासह अन्य आजारासंदर्भातील कागदपत्रे जोडली आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार आल्याने प्रशासनाने कागदपत्र पडताळणीसाठी समिती गठित केली होती. समितीने ५८१ शिक्षकांची कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयास दिली आहेत.

यापूर्वी दररोज दहा शिक्षकांची पडताळणी जिल्हा रुग्णालयामार्फत केली जात होती. मात्र, शिक्षकांची संख्या जास्त असल्याने दररोज २५ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. ७९ शिक्षकांची पडताळणी झाली असून यामध्ये यात १२ शिक्षकांची प्रमाणपत्र अमान्य करण्यात आली आहेत.

चार शिक्षक तपासणीसाठी गैरहजर होते. त्यामुळे शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांनी संबंधित १६ शिक्षकांना तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली असून आठ दिवसांत याबाबत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.