सातारा जिल्ह्यातील आशा सेविकांचे ‘झेडपी’समोर आंदोलन

0
80
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्रलंबित मागण्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी मंगळवारी आशा सेविकांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी मागण्‍यांबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्‍हा परिषद प्रशासनास दिले.

या निवेदनात, राज्य व केंद्र सरकारने थकीत मानधन तत्‍काळ देण्‍याची, आशांना आरोग्यवर्धिनीचा मोबदला मिळावा, सर्वेक्षणाचा मोबदला देण्‍याची, मातृ वंदना योजनेचे साहित्‍य देण्‍याची, आशांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्‍याची, अतिरिक्त कामांसाठी दबाव न टाकण्‍याची, जनसुरक्षा विधेयक मागे घेण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.

बुधवारी होणाऱ्या देशव्यापी संपात कामगार सहभाग नोंदवणार असल्‍याची, तसेच लोकशाही मूल्याची जपणूक करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. आंदोलनात आनंदी अवघडे, सुवर्णा पाटील, मनीषा संकपाळ, मंगल सावंत, वंदना कांबळे, सीमा भोसले, जयश्री काळभोर, कल्याणी शिंदे, शीला साळुंखे, मनीषा चव्हाण, मनीषा जगताप, निर्मला कांबळे, सविता थोरात, सुषमा वकीरकर, राणी कुंभार, विद्या कांबळे, ज्योती इंदलकर, रोहिणी खामकर, शैला साळुंखे, रोहिणी मोरे यांच्‍यासह इतर पदाधिकारी आणि आशा सेविका सहभागी झाल्‍या होत्‍या.