अतिवृष्टीमुळे भात उत्पादक शेतकरी नुकसान होण्याच्या भीतीने झाले चिंताग्रस्त

0
110
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात मे महिन्या पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली; परंतु सध्याच्या ऊन-पावसाच्या लपंडावामुळे भाताच्या तरव्यांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, भाताची तरवे पिवळे पडले असून, त्यांची वाढ खुंटली आहे. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरात भात उत्पादक शेतकरी भाताची तरवे पिवळे पडले असल्यामुळे चिंताग्रस्त झाले आहे.

कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरात भात पिकासाठी शेतकरी जमिनीची मशागत करून वाफे तयार करतात आणि भाताची तरवे लावतात. यंदा मे महिन्यातच पावसाने लवकर सुरुवात केल्याने तरवे टाकण्यास उशीर झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात टाकलेल्या तरव्यांवर जादा पावसामुळे काही शेतकर्‍यांचे तरव्याची उगवण झाली नाही, तर काही ठिकाणी उगवलेल्या तरव्यांना ऊन आणि पाऊस यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, तरवे पिवळी पडले, त्यांची उंची कमी झाली.

पावसाची अनिश्चितता आमच्यासाठी नवीन नाही, तरीही इंद्रायणी तांदळाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.कुजण्याची समस्या उद्भवली आहे. रोग नियंत्रणासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत असले, तरी यंदाच्या हंगामात भाताच्या तरव्यांचे मोठे नुकसान झाले आहे.