सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत नुकतीच पार पडली. सातारा तालुक्यातील 197 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेर आरक्षण शुक्रवारी सातारा पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आले. यामध्ये एप्रिल महिन्यात काढण्यात आलेली अनेक ठिकाणची आरक्षणे बदलली. या सोडत प्रक्रियेत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला, तर काहींना लॉटरी लागली आहे. ओपनच्या ठिकाणी राखीव पडल्याने अनेकांची संधी हुकली असून, बहुतांश ठिकाणी पत्नीच्या रूपाने सरपंचपदाची निकडणूक लढवण्याची संधी तयार झाली आहे.
प्रांताधिकारी आशीष बारकूल, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, निवडणूक नायब तहसीलदार युवराज गायककाड यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. सातारा तालुक्यात 197 ग्रामपंचायती आहेत. त्यातील डोळेगाव, चिंचणेर निंब, लिंबाचीकाडी, पाडळी, रेणाकळे, पोगरकाडी, कर्णे, संभाजीनगर, रामनगर, अंगापूर तर्फे तारगाव, कासोळे येथे अनुसूचित जाती महिला, तर आरगडकाडी, सारखळ, खोजेकाडी, टिटकेकाडी, गकडी, कामेरी, आष्टे नंबर 1, कुशी, गणेशवाडी, सोनकडी, ठोसेघर अनु. जाती खुले आरक्षण पडून ही गावे राखीव झाली आहेत. तर, आरळेत अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले आहे.
दरे बुद्रूक, कर्ये, गजकडी, कातकडी बु., लिंब, कोपर्डे, लांडेकाडी, काळोशी, धनकडेकाडी, नांदगाव, पानमळेकाडी, बोरणे, भाटमरळी, गोके गावांत ओबीसी महिला आरक्षण पडले असून, केणेखोल, क्षेत्रमाहुली, नुने, खिंडकाडी, तुकाईचीवाडी, गोजेगाव, सैदापूर, मालगाव, मर्डे, उफळी, किडगाव, कारी, जोतिबाची वाडीत ओबीसी खुले आरक्षण पडले आहे.