बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंच्या जिल्ह्यात पुलाचा 180 वा वाढदिवस; अनोख्या पद्धतीचे आंदोलनाने वेधलं राज्याचं लक्ष

0
804
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा जिल्ह्यात नुकतंच एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्या आंदोलनानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे. सातारा जिल्ह्यातील वडूथ – आरळे मार्गावरील सुमारे १८० वर्षाचा पुल गेल्या अनेक वर्षापासून हा पूल वाहतुकीसाठी धोक्याचा बनला आहे. या पुलाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्या कारणाने वडूथ गावातील काही ग्रामस्थांनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे पुलाचा १८० वा वाढदिवस साजरा केला आहे. या अनोख्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे पुलाला यंदा १८० वर्ष पूर्ण झाली असून मराठाकालीन कालखंडात छत्रपती शहाजीराजे यांनी हा पूल बांधला होता. 30 जून 1845 साली जनतेसाठी खुला करण्यात आला होता असे, पुलावरील दगडावर स्पष्ट उल्लेख केला आहे. कृष्णा नदीवर वसललेया या मुलामुळे हजारो नागरिकांचा प्रवास हा सुरक्षित आणि सुखरूप होतो. त्यामुळे या पुलाची किंमत इथल्या स्थानिकांनाच अधिक माहित… पंरतु गेल्या अनेक वर्षापासून हा पूल वाहतुकीसाठी धोक्याचा बनला आहे, पण याची प्रशासन काही दाखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी पुलाचा वाढदिवसच साजरा करून एकप्रकारे अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे.

सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम मराठाकालीन कालखंडात पूर्ण आहे.,पुलाची उभारणी ३० जून १८४५ साली झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच तब्बल १८० वर्षांपासून हा पूल वडूथ-आरळे गावकऱ्यांच्या सेवेत आहे. इतक्या मोठ्या कालावधीत या पुलावर अनेक नैसर्गिक संकटे ओढावली. पुलाला भगदाड पडले, खड्डे पडले तरीदेखील मलमपट्टी वगळता प्रशासनाने अन्य काहीही केले नाही. या पुलावरून वाहनांची मोठी गर्दी असते. सातारा ते लोणंद हि दोन शहर याच रस्त्यांनी जोडली आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुलावरून वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड होत असते.

पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

वाढे फाटापासून व वाढे गावातून पावसाचे येणारे पाणी पुलावरच येत असते. सध्या वाढे येथील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी सरपंच आराळे, उपसरपंच सुहास साबळे, भाजप युवा सचिव मदन साबळे, महेश साबळे, अभिजित साबळे ग्रा.पं सदस्य, साईराज कदम, रोहित गायकवाड, राजेंद्र कदम यांच्यासह अनेकांनी केली.

पुलावरील कोनशिलेला हार घालून कंदी पेढ्यांचे वाटप

भविष्यातील धोका ओळखून ग्रामस्थांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने उंबरठे झिजवले, आंदोलने केली; मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे वडूथ-आरळे ग्रामस्थांनी एकत्र येत या पुलाचा चक्क १८० वा वाढदिवस नुकताच साजरा करून प्रशासनाला जाग यावी म्हणून असा पद्धतीने आंदोलन केले आहे. अगदी पुलावरील कोनशिलेला हार घालून आलेल्या नागरिकांना कंदी पेढेही एकमेकांना भरविण्यात आले. पुलाच्या या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.