कराडमध्ये खासगी रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग; सुदैवाने जीवितहानी टळली

0
593
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहरात बुधवारी रात्री हादरवून सोडणारी घटना घडली. कराड शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गॅस पाईपला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धुराचे लोट पसरल्याने रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

या रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर सुमारे ४० रुग्ण उपचार घेत होते. शॉर्टसर्किटमुळे गॅस पाईपला लागलेली आग आणि त्यानंतर पसरलेला धूर यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये गोंधळ उडाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी कराड नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुमारे अर्ध्या तासानंतर हा किरकोळ प्रकार असल्याचे समजल्यावर रुग्ण आणि नातेवाइकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.